
ब्लॅकहेड्सप्रमाणेच व्हाइटहेड्सच्या समस्येकडे तितकेच गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. व्हाइटहेड्सची कारणे, उपचार आणि घरगुती उपायांबद्दल द एस्थेटिक क्लिनिक्सच्या कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट डॉ. रिंकी कपूर यांनी केलेले मार्गदर्शन…
व्हाइटहेड्सला ‘मुरुमांचे डाग’ असेही म्हटले जाऊ शकते. त्वचेच्या मृत पेशी (सीबम) म्हणूनही ते ओळखले जातात. तेलकट त्वचा आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकलेल्या बॅक्टेरियामुळे छिद्रे बंद झाल्यास व्हाइटहेड्सची समस्या होऊ शकते. अनेक कारणांमुळे छिद्रे ब्लॉक होतात. हार्मोनल बदलांमुळेदेखील छिद्रे ब्लॉक होऊ शकतात. चेहरा अति तेलकट झाल्यास व्हाइटहेड्स येतात.
व्हाइटहेड्स प्रामुख्याने चेहऱयावर दिसतात. म्हणजे कपाळ, नाक आणि हनुवटी तसेच मान, छाती, खांदे आणि पाठीवरदेखील दिसून येतात. व्हाइटहेड्स पह्डू नयेत. असे केल्याने संसर्ग, जळजळ, लालसरपणा, त्वचेवर डाग पडणे, हायपरपिग्मेंटेशन आणि वेदनादेखील होऊ शकतात. तरुण वय, मासिक पाळी, उष्ण हवामान अशी अनेक कारणे यामागे आहेत.
उपचार काय करावेत
डॉक्टरांनी शिफारस केलेल्या क्लिन्झरच्या मदतीने त्वचा योग्य प्रकारे स्वच्छ करावी. एक्सपहलिएशन त्वचेला मृत त्वचेच्या पेशींपासून मुक्त होण्यास आणि छिद्रे बंद करण्यास मदत करते. चांगली एक्सपहलिएटिंग उत्पादने वापरा, ज्यामुळे त्वचेवर ओरखडा येणार नाही. जळजळ आणि वेदना कमी करणारे क्रीम, जेल आणि मलमाचा वापर करा. नॉन-कॉमेडोजेनिक उत्पादनांची निवड करा, जी त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
घरगुती उपाय
व्हाइटहेड्सचा सामना करण्यासाठी घरगुती उपाय करता येतील. सॅलिसिलिक ऑसिड किंवा बेन्झॉयल पॅरॉक्साईड यांसारखे घटक असलेल्या चांगल्या क्लिन्झरने दररोज चेहरा स्वच्छ करा. छिद्रे उघडण्यासाठी किमान 15 मिनिटे वाफ घ्या. टी ट्री ऑइल वापरून कापसाने चेहरा पुसून घ्या. व्हाइटहेड्सवर एलोवेरा जेलदेखील लावू शकता आणि 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. सनस्क्रीन वापरा आणि बॅक्टेरियापासून त्वचेला दूर ठेवा. तुमचा स्मार्टपह्न, उश्या आणि सनग्लासेस नेहमी स्वच्छ करा. तुमचा मेकअप कधीही इतरांसोबत शेअर करू नका. प्रभावित भागावर मध लावून 15 मिनिटांनंतर स्वच्छ धुवा.