लेख – नकोसा ‘गोडवा’

2767

>> दिलीप जोशी 

गेल्या काही महिन्यांत तरुण मित्रांपैकी तीनचारजणांनी वाढता रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होत असण्याचं सांगितलं तेव्हा धक्काच बसला. चांगली निरोगी दिसणारी ऍक्टिव्ह माणसं! मग अचानक कुठून उद्भवले हे विकार? त्यांनाही कोड्यात टाकणारे. मग अर्थातच त्यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरू झाल्या. ‘सध्या मीगोडकमी केलंय. चहा नकोकिंवामीठ अगदी कमी असलेलं अळणी खाण्याची सवय करतोयअसेपथ्याचे बोल कानी पडू लागले.

अर्थात कोणताही विकार एका क्षणीअचानकजाणवला तरी त्याचा उद्भव शरीरात नकळत केव्हा तरी झालेला असतो. तो कळण्याची वेळ येते तेव्हा धक्का बसतो खरा, पण त्यातून सावरून त्यासह जीवनशैलीत बदल करून राहण्याची आणि हळूहळू त्या विकारावर मात करण्याची जिद्द बाळगली तर बराच फरक पडू शकतो. मात्र तरुण वयात असं काही झालं तरमलाच का?’ (व्हाय मी?) असा प्रश्न मनात येत राहणं स्वाभाविक असतं. ‘आतापासून हे पथ्यपाणी करावं लागणारएक तरुण हताश होऊन सांगत होता.

‘…पण कायमचं नाही. मधुमेह झालाय याचीच चिंता करत बसू नकोस. योग्य ती काळजी घे. नेमका, मोजका व्यायाम कर. लवकरच नॉर्मल होशील.’ ‘खरं सांगता?’ या त्याच्या शब्दातहे उगाच दिलासा देणारं बोलतायतअसाच सूर होता, पण रक्तदाब नियंत्रणात ठेवल्याचा आत्मानुभव आणि काही मधुमेहींनी प्रयत्नपूर्वक विकारावर केलेली मात ठाऊक असल्याने याविषयी आशादायी चित्र दिसतं. गेल्या आठवड्यात जागतिक मधुमेह जागृती दिवस पाळला गेला त्यानिमित्ताने हे आठवलं.

मग काही डॉक्टर मित्रांशी चर्चा करून आणिगुगलवगैरेवरून माहिती मिळवली. आमच्याकडे 14 नोव्हेंबर हाबालदिनम्हणून साजरा केला जातो. तीच तारीखवर्ल्ड डायलिसीस डेची आहे. याचं कारण म्हणजे मधुमेह आटोक्यात ठेवणाऱ्याइन्शुलिनऔषधाचा 1922 मध्ये शोध लावणाऱ्या फ्रेड्रिक बेल्टिंग यांचाही तो जन्मदिवस आहे. बेन्टिंग यांनी चार्लस बेस्ट आणि जॉन जेम्स यांच्या समवेतइन्शुलिनऔषधाची जगाला देणगी दिली आणिसाखरेचं खाणारत्याला मधुमेह झाला असेल तर तो काबूत ठेवणारा महत्त्वाचा उपाय दिला. 1991 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस मान्य करून याबाबत जगभर जनजागृती करण्याचं ठरवलं. आता हा दिवस जगातल्या 160 देशांत मधुमेह जागृती दिन म्हणून साजरा होतो.

या जागृतीची जागतिक आवश्यकता भासली. कारण शरीरात चोरपावलांनी शिरकार करणारा हा विकार 1980 मध्ये जागतिक लोकसंख्येच्या 4 टक्के होता तो 2012 पर्यंत दुप्पट झाला. सध्या जगातील सात अब्ज लोकांपैकी सुमारे 40 कोटी लोक या विकाराने ग्रासले असून त्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. हिंदुस्थानातील मधुमेहींची संख्या 8 ते 10 कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातं.

स्वभावात गोडवा जरूर असावा, पण शरीर व्यापून ताप देणारा असागोडवानकोसाच वाटणार. मधुमेहाची कल्पना आपल्याकडे पूर्वापार आहे. आयुर्वेदातही त्यावर विचार झालाय. मधुमेहांपैकी पहिल्या प्रकारचा (टाइप वन) मधुमेह हा बहुधा जन्मजात (ज्युवेनाइल) असतो. त्याचं प्रमाण अनुवंशिक व तुलनेने कमी आहे. दुसऱ्या प्रकारचा (टाइपटू) मधुमेह पूर्वी साधारण चाळीशीला काही जणांनाच गाठायचा. आता ते प्रमाण वाढलंय आणि पंचविशीच्या आसपासच मधुमेह नकोशीगोडबातमी कित्येकांना देतोय. काय असावं या मागचं कारण? बदलती जीवनशैली, बैठे काम, ‘एसीआरामातकाम करताना अधूनमधूनजंक फूडखाण्याची सवय, व्यायामाचा अभाव आणि त्यात भरीस भर म्हणून विविध प्रकारचं सततचं टेन्शन! यातलाताणतणावहा आता व्यवसायाचाच भाग झालाय. कमी पैसे मिळणाऱ्यांना चिंता असतेच, पण जास्त मिळणारेही चिंतामुक्त नाहीत असं दिसतं, अन्यथा संपन्न मानलेल्या अमेरिकेत 9 टक्के लोकांना मधुमेह का व्हावा! एवढंच नव्हे तर तिथे आणखी आठदहा कोटी मधुमेहाच्या उंबरठय़ावर (बॉर्डर लाइनवर) आहेत हे मानसिक संपन्नतेचं लक्षण तर नव्हेच.

2030 पर्यंत जगात मधुमेहींची संख्या खूप वाढणार आहे. याला ठरावीक जीवनशैलीच कारणीभूत असेल असं निश्चित सांगता येणार नसलं तरी समाजातल्या प्रत्येकालाच कसलं ना कसलंटेन्शनसतावत असतंच. मूळची प्रकृती, अनुवंशिक आजार वगैरे लक्षात घेता कोणालाहीगोडबातमी कधी समजेल काय सांगावं? त्यातच वाढत्या प्रदूषणाने जगातील सजीवांचा श्वासच कोंडलाय, तर या इतक्या अडथळ्यांचीशर्यतजिंकून स्वतःला तंदुरुस्त निरोगी ठेवण्याची जबरदस्त मानसिक जिद्द हवी. आजार झालाच तर तो योग्य प्रकारेमॅनेजकरून (म्हणजे नियमित औषध घेऊन, पथ्य करून) निराश न होता कालक्रमणा करीत राहिलं तर आजारही पराभूत होतात. त्यासाठी मनातला गोडवा वाढवणं, प्रसन्न राहणं हाच चांगला उपाय

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या