डीमॅट अकाऊंट !

वस्तूच्या खरेदी-विक्रीसाठी आपण चलन म्हणून पैशांचा वापर करतो. पैशांच्या साठवणुकीसाठी किंवा पैशांच्या देवाणघेवाणीसाठी बँक अकाऊंटचा वापर करतो. पैसे काढणे, चेक देणे, पैसे ट्रान्सफर करणे, बिल्स देणे किंवा ऑनलाइन व्यवहारांसाठी बँक सुविधा उपलब्ध करून देत असते. आज अशी व्यक्ती सापडणे कठीण आहे की, जिचे बँक अकाऊंट नाही किंवा बँक माहीत नाही.

आज डीमॅट अकाऊंट ही बँक सिस्टम इतकीच सोपी आणि आवश्यक गोष्ट आहे. शेअर्स, बाँड्स, म्युच्युअल फंड्स होल्ड करण्यासाठी आणि खरेदी-विक्रीसाठी डीमॅट अकाऊंट गरजेचे ठरते. जेव्हा तुम्ही शेअर्स खरेदी करता, तेव्हा ते तुमच्या डीमॅट अकाऊंटमध्ये व्रेडिट किंवा डेबिट होत असतात. आपले डीमॅट अकाऊंट आपल्या बँक अकाऊंटशी लिंक्ड असते. आज डीमॅट अकाऊंटमुळे फिजिकल शेअर्स बाळगण्याची गरज उरलेली नाही.

 डीमॅट अकाऊंट ही बँक सिस्टम इतकीच सोपी आणि आवश्यक गोष्ट आहे. शेअर्स, बाँड्स, म्युच्युअल फंड्स होल्ड करण्यासाठी आणि खरेदीविक्रीसाठी डीमॅट अकाऊंट गरजेचे ठरते. डीमॅट अकाऊंट सुरू करण्यासाठी

 • एनएसडीएल किंवा सीडीएसएलकडे रजिस्टर असलेले डिपॉझिटरी पार्टिसिपंट निवडा. ज्याला ब्रोकर असेही म्हटले जाते, जो आपले डीमॅट अकाऊंट ओपन आणि मेंटेन करू शकेल.
 • प्रत्यक्ष फिजिकल फॉर्म किंवा ब्रोकरच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीनेही
  फॉर्म भरता येतो, ज्यात आपली व्यक्तिगत माहिती जसे की, नाव, पत्ता, पॅन नंबर, बँक अकाऊंट डीटेल्स आणि संपर्क क्रमांक पुरवणे आवश्यक असते.
 • केवायसी म्हणजेच आपण तीच व्यक्ती आहोत याची पडताळणी.
  पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट, व्होटर आयडी किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केवायसी केली जाते. दोन्ही बाजूंच्या विश्वासार्हतेसाठी ही पडताळणी आवश्यक असते.
 • ब्रोकर आणि आपल्यात होणाऱया अॅग्रीमेंटवर सह्या करणे आवश्यक असते. आजकाल ऑनलाइनच्या जमान्यात याचे महत्त्व कमी झाले असले तरी ब्रोकरच्या टर्म्स आणि पंडिशन्स समजून घेणे आवश्यक ठरते.
 • अकाऊंट ओपनिंगचे चार्ज ब्रोकर-टू-ब्रोकर वेगवेगळे असतात. काही ब्रोकर आपल्या ग्राहकांसाठी काही ऑफर्स ठेवतात, तर काही ठिकाणी विनामूल्यही अकाऊंट ओपन करता येते. आज ब्रोकरचा एक्सेस सहज उपलब्ध आहे.
 • केवायसी किंवा कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ब्रोकरकडून तुम्हाला बेनेफिशरी ओनर आयडेंटिफिकेशन नंबर दिला जातो, ज्याच्या आधारे तुम्ही तुमचे डीमॅट अकाऊंट ऑनलाइन किंवा ब्रोकरच्या मोबाइल अॅपद्वारे एक्सेस करू शकता. शेअर्स खरेदी-विक्रीचे व्यवहार करू शकता.
 • आज बाजारात ब्रोकर्सचे खूप पर्याय उपलब्ध आहेत. आपण आपल्या सोयीनुसार आणि पसंतीनुसार ब्रोकर निवडू शकतो.

 –  प्रवीण धोपट, (लेखक दीपंकर फिनपॅप इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)