
प्रत्येकाच्या आयुष्यात एका रंगाला विशेष महत्त्व असते. आवडता रंग म्हणून आपले कपडे आणि रोजच्या वापरातील वस्तू आपण त्याच रंगाचे घेणे पसंत करतो. मानसशास्त्रीयदृष्ट्या ठराविक रंग तुमचा स्वभाव दर्शवतो.

काळा : जर तुमचा आवडता रंग जर काळा असेल तर, तुम्ही कलाकार आहात. काळा रंग आवडणार्या व्यक्ती भावनाप्रधान असतात. लोकांमध्ये रमतात, पण लोकांपुढे पूर्ण खुलत नाहीत. काही गोष्टी गुपितच ठेवतात.
पांढरा : पांढरा रंग आवडणारी तर्कशुद्ध व्यक्ती असते, पसारा केलेला त्यांना आवडत नाही.
लाल : लाल रंग आवडणाऱ्या व्यक्ती जगण्याचा खरा आनंद घेतात, उत्साही आणि आत्मविश्वासू असतात.
निळा : निळा रंग आवडणारी व्यक्ती ही जबाबदार असते. प्रामाणिक तसेच दुसर्यांचा विचार करणारी असते. तसेच स्वच्छतेसाठी आग्रही असतात.
गुलाबी : ज्यांना गुलाबी रंग आवडतो ते वयाने जरी मोठे असले तरी ते बालिश असतात. सत्य परिस्थितीतून पळण्याचा त्यांचा स्वभाव असतो.
नारिंगी : नारिंगी रंग आवडणारी व्यक्ती गंभीर स्वभावाची असते. लग्नासारख्या बंधनं स्वीकारण्यास त्यांचा विरोध असतो.
हिरवा : हिरवा रंग आवडणाऱ्या व्यक्ती प्रामाणिक आणि मनमोकळ्या स्वभावाच्या असतात. समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करत असेल याबाबत ते नेहमी जागृक असतात.
पिवळा : पिवळा रंग आवडणारी विजीगिषु वृत्तीचे असतात. मिळालेले ज्ञानदानात यांना आनंद मिळतो.
चॉकलेटी: चॉकलेटी रंग आवडणार्या व्यक्ती खूप चांगली मैत्री निभावतात. स्थिर जीवन जगण्यासाठी या व्यक्ती सतत प्रयत्नशील असतात.
राखाडी: हा रंग तटस्थता दर्शवतो. व्यवहारात विश्वास ठेवणार्यांचा आवडता रंग राखाडी (ग्रे) असतो.

































































