शेतात कांद्यापासून साकारली कलाकृती

अवघे जग नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तयार झालंय. मग मातीतील कलावंत मागे कसे राहतील. बार्शी तालुक्यातील जामगाव येथील दिव्यांग चित्रकार महेश मस्केने शेतामध्ये नववर्षाचे स्वागत करणारी अनोखी कलाकृती साकारली आहे. महेशने  कांद्यापासून 50 बाय 20 फूट आकाराची कलाकृती बनवत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दहाजणांना मदतीने तीन तासांमध्ये त्याने ही कलाकृती बनवली. त्या माध्यमातून अन्नदात्या शेतकऱयाला सलाम करण्यात आला आहे.