जेव्हा भर संसदेत जेटली मोदींसोबत हस्तांदोलनास नकार देतात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

किडनी प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया केल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी अरुण जेटली यांनी गुरुवारी पहिल्यांदाच राज्यसभेमध्ये हजेरी लावली. या दरम्यान एक अनोखा प्रसंग कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हरिवंश सिंह यांची राज्यसभा उपसभापती निवड झाल्यानंतर अभिनंदन देत असताना मोदींनी अरुण जेटली यांच्याकडे हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. परंतु जेटली यांनी हस्तांदोलनास नकार देत हात जोडून फक्त नमस्कार केला. त्यानंतर मोदींनीही त्यांना हात जोडून नमस्कार केला.

संसदेतमध्ये गुरुवारी राज्यभेच्या उपसभापतीसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत मतदानासाठी अरुण जेटली राज्यसभेत हजर झाले होते. किडनी प्रत्यारोपनानंतर ते पहिल्यांदाच राज्यसभेत आले. या निवडणुकीत हरिवंश सिंह यांचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान मोदी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या खूर्चीकडे उत्साहाने गेले आणि त्यांचे अभिनंदन केले. यानंतर परत आपल्या जागी येताना त्यांनी खूर्ची शेजारी उभ्या अरुण जेटली यांच्याकडे हस्तांदोलनासाठी हात नेता मात्र जेटलींनी नकार दिला.

का दिला नकार?
किडनी प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया केल्यामुळे अतिशय सावधगिरी बाळगण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. लोकांसोबत हस्तांदोलन, भेटी-गाठी कमी ठेवण्यास सांगितले आहे. याचमुळे ते गेल्या तीन महिन्यांपासून घरी होते आणि त्याच्याकडे असणाऱ्या अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कारभार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला होता.