गडकरींनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांचे एक्झिट पोलबाबत मोठे विधान

62
rafale-arun-jaitley

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक्झिट पोलबाबत मोठे विधान केले आहे. एक्झिट पोलनुसारच 2019 चे निकाल लागतील, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता स्पापन केली जाईल, असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला आहे.

रविवारी लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन करेल असे दिसत आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये एनडीए 272 जा जादुई आकडा पार करताना दिसत आहे. याच संदर्भात अरुण जेटली यांनी सोमवारी एक ब्लॉ़ग लिहिला. यात त्यांनी आपण एक्झिट पोलची सत्यता आणि त्यांची योग्यता याबात तक्रार करू शकतो असे म्हटले. परंतु भिन्न प्रकारच्या कंपनींनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये समानता असेल तर निकालही तसाच लागेल. तसेच एक्झिट पोलमध्ये ईव्हीएमचे काहीही योगदान नाही, तसेच एक्झिट पोलसारखेच निकाल लागले तर विरोधकांना उपस्थित केलेला ईव्हीएचा मुद्दा अस्तित्वात राहणार नाही.

लोकशाही परिपक्व
जेटली पुढे म्हणतात, एक्झिट पोल 2014 च्या निवडणुकीच्या परिणामांसारखे आहेत त्यामुळे हिंदुस्थानची लोकशाही खूपच परिपक्व होत आहे. मतदार आपली पसंद निवडण्याआधी राष्ट्रहिताला प्राधान्य देत आहेत. जेव्हा चांगल्या विचारांचे लोक समान विचारधारा असणाऱ्या लोकांसोबत येतात तेव्हा एक लहर निर्माण होते. यावेळी जेटली यांनी काँग्रेसचा उल्लेख न करता गांधी कुटुंब ग्रँड ओल्ड पार्टीसाठी बोजा बनले आहे, असा टोला लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या