
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खरेच पदवी आहे का? असेल तर ते दाखवत का नाहीत? गुजरात न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्या शिक्षणाबाबतचा संशय अधिकच बळावला आहे. एकतर मोदींची पदवी बनावट असावी किंवा त्यांचा अहंकार आड येतोय, असा टोला लगावत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र्ा सोडले.
पंतप्रधान मोदींच्या पदवी प्रमाणपत्राची माहिती कुणालाही देण्यात येऊ नये असे आदेश देतानाच गुजरात उच्च न्यायालयाने मोदींची डिग्री मागितली म्हणून केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या शैक्षणिक अर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अमित शहांनी पदवी दाखवली, मोदी का नाही दाखवत?
पंतप्रधान मोदींनी जर गुजरात विद्यापीठ किंवा दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले असते तर त्यांनी ते साजरे करायला हवे होते, त्याऐवजी ते माहिती लपवत आहेत. अमित शहा यांनी त्यांची पदवी दाखवली होती. मोदींची पदवी वैध असेल तर मोदी किंवा गुजरात विद्यापीठ ती का दाखवत नाहीत, असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे.
मोदी सुशिक्षित असते तर नोटाबंदी केली नसती
पंतप्रधान सुशिक्षित नसतील तर अधिकारी आणि किकिध प्रकारचे लोक येऊन कुठेही त्यांची सही घेतील. त्यांच्याकडून काहीही मंजूर करून घेतील. नोटाबंदी, जीएसटीसारख्या निर्णयांनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. पंतप्रधान मोदी सुशिक्षित असते तर त्यांनी नोटाबंदी लागू केली नसती, असा टोला केजरीवाल यांनी लगावला.
– देशाच्या पंतप्रधानांची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याचे अधिकार जनतेला आहेत, मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे जनता चकित झाली आहे. लोकशाही व्यवस्थेत माहिती मिळविण्याचे आणि प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य असायला हवे, असे केजरीवाल म्हणाले.
– निरक्षर असणे हा ‘गुन्हा किंवा पाप’ नाही. कारण देशात खूप गरिबी आहे. कुटुंबातील आर्थिक परिस्थितीमुळे आपल्यापैकी बरेचजण औपचारिक शिक्षण घेण्याच्या स्थितीत नाहीत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही गरिबी देशाला सतावत आहे, असेही ते म्हणाले.
काही लोकांनी माझ्या बदनामीची सुपारी दिलीय
देशातील आणि देशाबाहेरील काही लोकांनी माझी प्रतिमा खराब करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी माझ्या बदनामीची सुपारी त्यांनी दिली आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केला. भोपाळ-दिल्ली वंदे भारत एक्प्रेस ट्रेनला हिरका झेंडा दाखकल्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, देशात विकासासाठी सुरू असणाऱया प्रयत्नांमध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. 2014 पासून देशातील काही लोकांनी मोदींची प्रतिमा डागाळण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी तसा संकल्प केला आहे. या लोकांनी वेगवेगळय़ा प्रकारच्या लोकांना माझी सुपारी दिली आहे. त्यांनी स्वतःही मोर्चा सांभाळला आहे. त्यांची साथ देणारे काहीजण देशात, तर काहीजण देशाबाहेर आहेत.

























































