गरिबांच्या खाण्यावरही टॅक्स, श्रीमंतांना 5 लाख कोटींपर्यंतचे कर्ज माफ; अरविंद केजरीवाल यांचा पलटवार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेवडी कल्चर वर टीका करताना केजरीवाल म्हणाले सर्वसामान्य जनतेची फसवणूक होत आहे. केंद्र सरकार गरिबांच्या खाण्यापिण्याच्या जीवनावश्यक गोष्टींवरही टॅक्स लावत आहे. तर मोठे व्यापारी आणि उद्योजकांचे 5 लाख कोटींपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येत आहे.

काही दिवसांपासून जनतेला देण्यात येणाऱअया मोफत सुविधा बंद करण्यात येत आहेत. केंद्र सरकारची आऱ्थइक स्थिती खालवली असल्याचे हे संकेत आहे काय, असा सवालही त्यांनी केला. अग्निपथ योजना आणण्यात आली कारण सैनिकांच्या पेन्शनचा खर्च वाढला आहे. तो केंद्र सरकार पेलू शकत नाही. स्वातंत्र्यानंतर हे पहिले सरकार असेल ज्यांना सैनिकांच्या पेन्शनचा खर्च परवडत नाही.

केंद्र सरकारची आठवा वेतन आयोग आणण्यासाठी नकार दिला आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी दिलासा ठरणाऱ्या मनरेगा योजनेसाठीही सरकारकडे पैसे नाहीत. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात नमूद केलेला निधई नेमका कोठे गेला, असा सवालही त्यांनी केला आहे. केंद्र सरकारने त्यांच्या उद्योजक मित्रांचे कोट्यवधींचे कर्ज का माफ केले, ही कर्जे माफ केली नसती तर टॅक्स लावण्याची गरज नव्हती. पेट्रोल-डिझेलच्या टॅक्समधून सरकारला साडेतीन लाख कोटी मिळतात. हा पैसा कोठे जातो, असा सवालही त्यांनी केला आहे. सरकारी शाळा आणि गरिबांवर होणारे मोफत उपचार बंद करण्याचा विचार सुरू आहे. अशआ परिस्थितीत गरीब जगण्यासाठी पैसे कसे उभे करणार, देशाची संपत्ती काही मूठभर श्रीमंतावर खर्च केली तर गरिबांनी जगायचे कसे असा सवालही त्यांनी केला.

केजरीवाल यांच्या आरोपांना भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी उत्तर दिले आहे. केंद्र सरकारने कोणाचेही कर्ज माफ केले नाही. 2014-15 पासून 6.5 लाख कोटींचे कर्ज वसूल करण्यात आले आहेत. अग्निवीर योजना सैनिकांच्या पेन्शनचा खर्च वाचवण्यासाठी आणण्यात आलेली नाही. सैनिकांसाठी केंद्र सरकारकडे पैसा आहे. तसेच खाण्याच्या खुल्या वस्तूंवर कर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.