
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आम आदमी पार्टी भाजप विरोधात मोर्चेबाजी केली. दरम्यान, केजरीवाल यांनी भगवद्गीतेतील श्लोकाचा संदर्भ देऊन भाजपवर कडाडून टीका केली. भाजपच्या पापाचा घडा आता भरला आहे, असं केजरीवाल यावेळी म्हणाले.
केजरीवाल म्हणाले की, भाजप सत्तेसाठी देशत विकू शकतो. पण त्याच्या पापाचा घडा आता भरला आहे. केल्या काही वर्षांपासून आपण नेहमी ऐकत आलो आहोत की भाजप निवडणुकीत हेराफेरी करतो, हेराफेरी करून निवडणुकीत विजय मिळवतो. ईव्हीएममध्ये घोटाळा, मतदार यादीतून नावं गायब करणे, खोटी नावं जोडणे, खोटी मतं टाकणं हेही ऐकलं आहे. पण कशाचाच आतापर्यंत पुरावा सापडलेला नाही. गीतेत एक श्लोक आहे की जेव्हा कधी पृथ्वीवर पाप वाढेल तेव्हा परमेश्वर पृथ्वीवर अवतार घेईल. आता परमेश्वर वरूनच झाडूने यांना झाडून टाकणार आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.
आता भाजपच्या पापाचा घडा भरला आहे. त्यामुळे जगातला सगळ्यात मोठा पक्ष मतांची चोरी करताना रंगेहात पकडला गेला आहे, अशा शब्दांत केजरीवाल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.























































