न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र महासभेत शिवसेनेच्या वाघाची डरकाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र महासभेच्या 73व्या सत्रात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मानव वसाहती, गृहनिर्माण, कायमस्वरुपी नागरी विकास, शाश्वत शहरीकरण आणि संयुक्त राष्ट्र आवास योजना सशक्तीकरण यासंबंधातील महासभेतील चर्चेच्या निष्पत्तीची अंमलबजावणी या विषयावर हिंदुस्थानातर्फे निवेदन सादर केलं.

जगातील एकूण लोकसंख्येच्या एक षष्ठांश लोकसंख्या सध्या हिंदुस्थानात राहते. त्यानुसार हिंदुस्थानात होणारा जलद आर्थिक विकास आणि द्रारिद्र्य निर्मूलन या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी निवेदन सादर केले. वाढतं शहरीकरण, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, दळणवळणाची साधने, गृहनिर्माण, स्वच्छता, आरोग्यसेवा, शैक्षणिक सुविधा, आर्थिक नियोजन, प्रदूषण, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी आव्हांनविषयीही त्यांनी नमूद केले.

summary- arvind sawant at un meeting