आमची शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची आणि निष्ठावंत शिवसैनिकांची – अरविंद सावंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतो. आमचे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारातही झुकले नव्हते. आता सरकारमध्ये असलेली मंडळी हुजरेगिरी करत आहेत. अशा हुजरेगिरी करणाऱ्यांना आम्हांला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार आहे काय, असा सवाल करत खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणारी आमची शिवसेना आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिकांची आमची शिवसेना आहे, असेही सावंत यांनी सांगितले. शिंदे- फडणवीस यांनी विचारलेले प्रश्न आम्हांला विचारू नका, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. आम्हाला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार त्यांना आहे काय, असा सवालही सावंत यांनी केला.

आपला त्यांना एकच प्रश्न आहे, जे पावन झाले, त्यांच्यावरील ईडीच्या कारवाईचे काय झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा नारायण राणे यांच्यावरील कारवाईचे काय झाले. धुलाई मशीनमधून धुवून आलेल्या माणसांचे काय झाले ते सांगा. त्यांना रोज एकच प्रश्न विचारा, यांचे काय झाले. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलेच पाहिजे, त्याशिवाय त्यांनी इतर विषयांवर बोलूच नये. त्यांनी अनैतिकता स्वीकरून नैतिकता सोडलेली आहे. हे बेकायदा सरकार आहे, त्यांच्या प्रश्नांना का उत्तरे द्यायची, असे सावंत म्हणाले.