लोकसभेत शिवसेनेचे अरविंद सावंत टॉपर, उदयनराजे शेवटून पहिले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्रिमंडळात अरविंद सावंत यांची वर्णी लागणार

सामना प्रतिनिधी, मुंबई

लोकसभेत आपापल्या मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न विचारण्यात, लोकहिताच्या चर्चेत सहभागी होण्यात शिवसेनेचे खासदार अव्वल ठरले आहेत, तर साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले शेवटून पहिले आले आहेत.

दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत हे टॉपर आहेत. त्यांनी लोकसभेत 478 प्रश्न विचारतानाच 286 वेळा चर्चेत सहभाग घेतला. 98 टक्के हजेरी लावली, तर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत 841 प्रश्न विचारून 208 वेळा चर्चेत सहभाग घेतला. त्यांनी 94 टक्के हजेरी लावली. ते वरून पाचव्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमाकांवर भाजपचे किरीट सोमय्या, तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे तर चौथ्या क्रमांकावर सुनील गायकवाड आहेत.

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा शेवटून पहिला नंबर आला आहे. कॉलर उडवणे असो किंवा त्यांच्यावर रचलेली गाणी असोत, कार्यकर्त्यांमध्ये रमणाऱ्या राजांनी लोकसभेत केवळ 27 टक्के हजेरी लावली. त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही, की कोणत्या चर्चेत भाग घेतला नाही. त्यामुळे ते शेवटून पहिले आले आहेत. तर नांदेडचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.