
खासदार असादुद्दीन ओवैसी अध्यक्ष असलेले मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाचे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले आहे. इतकेच नाहीए तर हॅकर्संनी पक्षाचे नाव बदलून जगातील श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कचे नाव आणि फोटो ठेवला आहे.
एक आवाज़, इंसाफ़ की. हक़ की. कमज़ोरों की. ☝️ – बैरिस्टर @asadowaisi pic.twitter.com/ze4H0siKXF
— Ꭼꮮꮻɴ Ꮇꮜꮪꮶ- (@aimim_national) July 18, 2021
खासदार ओवेसी शुक्रवारी उत्त प्रदेशच्या दौर्याdवर होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांनी हा दौरा केला होता असे म्हटले होते.
#WATCH | Scores of AIMIM chief Asaduddin Owaisi supporters gathered in UP’s Moradabad during his roadshow yesterday pic.twitter.com/RdS5u9jL6N
— ANI UP (@ANINewsUP) July 15, 2021
पक्षाचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर एमआयएमच्या उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते. हे अकाऊंट काही वेळासाठी बंद ठेवण्यात आले होते, आता ते सुरू करण्यात आले आहे.




























































