जिथे सांगाल तिथे येतो, घाला मला गोळ्या; ओवैसींचे अनुराग ठाकूर यांना आव्हान

760

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘देशातील गद्दारांना गोळ्या घातल्या पाहिजे’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांना फटकारले आहे. तसेच ‘तुम्ही मला गोळ्या घाला. त्यासाठी तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे.’ असे आव्हान ओवैसी यांनी अनुराग ठाकूर यांना दिले आहे.

‘अनुराग ठाकूर मी तुम्हाला आव्हान करतो की तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे. मला गोळ्या घाला. तुमच्या या वक्तव्यांनी मला घाबरवलेले नाही. कारण आमच्या हजारों आयाबहिणी रस्त्यावर उतरल्या असून त्यांनी देशाला वाचविण्याचा निर्णय घेतला आहे’, असे ओवैसी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमावेळी म्हणाले.

त्यांनी ठाकूर यांच्या वक्तव्यावर मंगळवारी ट्विटर वरून देखील टीका केली होती. ‘अनुराग ठाकूर यांचे काम विक्रमी वेगाने घसरत चाललेल्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्याचे आहे. मात्र ते हिटलरचे अर्थमंत्री वॉल्थर फंक यांच्या सारखे वागत आहेत. फंक यांना युद्ध गुन्ह्यांसाठी शिक्षा झाली होती’, अशी टीका ओवेसी यांनी या ट्वीटमधून केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या