सरकार उपग्रह उध्वस्त करू शकते मग मसूदचा खात्मा का नाही करू शकत, ओवेसींचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार जर अवकाशातील उपग्रह उध्वस्त करू शकते तर ते मसूद अजहर, हाफीज सईदसारख्या दहशतवाद्यांचा खात्मा का करू शकत नाही, असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. हैदराबाद येथे एका सभेत बोलताना त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

‘2014 मध्ये मोदींनी तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. कुठे गेले ते आश्वसन? मोदी फक्त आश्वासन देतात त्यांनी आतापर्यंत कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नाही. हाफीज सईद व मसूज अजहरवर कारवाई करण्याबाबतही तेच झाले. जर सरकार क्षेपणास्त्राच्या मदतीने उपग्रह उध्वस्त करू शकते तर मुंबई व पुलवामा हल्ल्यात निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या मसूद अजहर व हाफीज सईद यांचा खात्मा का करू शकत नाही, असा सवाल औवेसीने केला आहे.