गोडसेंची औलाद अजुनही जिवंत, मला कधीही गोळ्या घालू शकतात! – ओवैसी

4819

जम्मू-कश्मीर मुद्द्यावरून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारचा कश्मीरमधील जमिनीवर डोळा असल्याचा आरोप केला. तसेत गोडसेंची औलाद अजुनही जिवंत अलून मला कधीही गोळ्या घालू शकते, अशी भितीही त्यांनी बोलून दाखवली.

ओवैसींच्या तोंडी दहशतवादी मसूदची भाषा, म्हणे भाजपचे कश्मिरच्या जमिनीवर प्रेम

खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, ‘मला माहिती आहे एक दिवस मलाही गोळ्या घातल्या जातील. देशात अजूनही गोडसेची औलाद जिवंत असून ते मला गोळ्या घालू शकतात.’ कलम 370 रद्द केल्यापासून ते सातत्याने केंद्र सरकारवर आगपाखड करत आहेत.

आणखी एक महाभारत?
दाक्षिणात्य अभिनेते, सुपरस्टार रजनीकांत यांनी मोदी सरकारचे कौतुक केल्याने ओवैसी भडकले आहेत. कलम 370 रद्द केल्यानंतर अभिनेते रजनीकांत यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना ‘कृष्ण आणि अर्जुन’ संबोधले होते. मग अशा स्थितीत कौरव आणि पांडव कोण? देशात आपल्याला पुन्हा एक महाभारत हवे आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तिथे दोन झेंडे चालतात का?
केंद्र सरकार ईशान्येकडील राज्यातील नागा लोकांशी चर्चा करते. त्यांनी हत्यारही सोडलेले नाही. त्यांचा एखादा मोठा नेता मृत्यू पावल्यास ते आपला स्वतंत्र झेंडा फडकवतात, तिरंगा नाही. केंद्राला तिथे दोन झेंडे फडकत असल्याचे दिसत नाही का? की लोकांना वेड्यात काढायचा प्रयत्न सुरू आहे? असा सवालही त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या