
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला आसाराम पुन्हा एकदा तुरुंगात गेला आहे. जामिनावर बाहेर असलेल्या आसारामचा अंतरिम जामीन वाढवण्यास राजस्थान उच्च न्यायालयाने नकार दिल्याने आसारामला जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शनिवारी जावे लागले. न्यायाधीश दिनेश मेहता आणि न्यायाधीश विनीत कुमार माथुर यांच्या खंडपीठाने आपल्या सुनावणीत म्हटले की, आसारामची प्रकृती स्थिर आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्याची किंवा वैद्यकीय उपचाराची गरज नाही. जानेवारी 2025 मध्ये 12 वर्षांनंतर आसारामला जामीन मिळाला होता.