जगाच्या पाठीवर – जगातील आणि भारतातील पहिली सर्कस

>> आशा फडके

बालमित्रांनो, सर्कस, जादू, कार्टून हे आबालवृद्धांना आवडतात. 11 डिसेंबर 1852 रोजी फ्रान्समध्ये पारिस येथे सर्कस सुरू झाली. डी हायवर ही सर्कस एकाच इमारतीत कित्येक वर्षे चालू आहे. त्यापूर्वी अमेरिकेत 1690 मध्ये रायल हानफोर्ड सर्कस सुरू झाली. ही सर्कस जगातील सगळय़ात जुनी सर्कस समजली जाते. फ्रान्समधील डी हायवर ही सर्कस एकाच ठिकाणी दाखवली जाते तर, अमेरिकेतील सर्कस वेगवेगळय़ा शहरांत, गावांत जाऊन लोकांचे मनोरंजन करते. ही सर्कस 1951 साली आलेल्या अमेरिकन चित्रपट ‘व्हेन आय ग्रो अप’ यात दाखविण्यात आलेली आहे. 1880 मध्ये विष्णुपंत मोरेश्वर छत्रे यांनी ‘दी ग्रेट इंडियन सर्कस’ ही भारतात काढलेली पहिली सर्कस होती. छत्रे यांनी इटलीतून आलेल्या रायल इटालियन सर्कस मुंबईत पाहिली आणि त्यापासून प्रेरणा घेत भारतीय सर्कस सुरू केली. 1887 मध्ये प्रियानाथ बोस यांनी ‘दी ग्रेट बंगाल सर्कस’ काढली. 1909 मध्ये माधुस्कर सर्कस सुरू झाली. 1920 मध्ये बाबूराव कदम यांनी ‘दी ग्रँड बाम्बे सर्कस’ सुरू केली.