सेवानिवृत्त सेविकांना एकरकमी मानधन मिळणार, यशोमती ठाकूर यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीसांना एलआयसी योजनेअंतर्गत निवृत्तीनंतर एकरकमी मानधन दिवाळीच्या आत देण्यात येईल अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दिली.

अंगणकाडी सेविकांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, एल.आय.सी.चे अधिकारी उपस्थित होते.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱयांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, सेवेतून काढून टाकल्यानंतर अथवा मुख्य सेकिका, पर्यवेक्षिका या पदावर निवड होईपर्यंत एल.आय.सी. योजनेतंर्गत एकरक्कमी लाभ देण्याबाबतची योजना राज्यात सुरू आहे. या योजनेअंतर्गत 2020-21 या वर्षांत अशी 900 प्रकरणे आली होती यापैकी 875 प्रकरणांमध्ये अंगणवाडी सेविकांना योजनेचा फायदा देण्यात आला आता उर्करीत प्रकरणांकर त्वरित निर्णय घेऊन या सेविकांची दिवाळी गोड करण्याचे आदेश देण्यात आल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.