दांडी येथे २३ रोजी आषाढी एकादशी दिंडी सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
वैष्णवांचा उत्साह शिखरावर

सामना प्रतिनिधी । मालवण

दांडी येथील श्रीकृष्ण मंदिरात २३ रोजी आषाढी एकादशी दिंडी सोहळा होणार आहे. यानिमित्त सकाळी ६ वाजल्यापासून पूजाअर्चा, भजने, नामस्मरण, आरती असे कार्यक्रम होणार आहेत. तर दुपारी ३ वाजात श्रीकृष्ण मंदिरकडून ढोलताशांच्या गजरात वारकरी दिंडी निघणार आहे. तरी सर्वानी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.