मुंबई हौसिंग फेडरेशनची निवडणूक, बिनविरोध सहकार पॅनेलचे निर्विवाद बहुमत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई हौसिंग फेडरेशनची निवडणूक बिनविरोध झाली असून सहकार पॅनेलचे सर्व 21 उमेदवार विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघातून विद्यमान अध्यक्ष प्रकाश दरेकर, अजय बागल, हेमंत दळवी, शाम दरेकर, मुकेश घुमरे, आशिष गोयल, ज्ञानेश्वर महाजन, विशाल कडणे, आनंद माईंगडे, विजय पवार, व्यंकटेश सामंत, विष्णू सावळ, यशवंत सावंत, विजय शेलार, वसंत शिंदे, दत्तात्रय वडेर, तर महिला राखीव मतदारसंघातून ऍड. शुभांगी सारंग, सविता झेंडे, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून प्रमोद तायडे, इतर मागास प्रवर्गातून सुहास आडिवरेकर, विशेष मागास प्रवर्गातून ज्ञानेश्वर गोसावी हे निवडून आले. राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार पॅनेल’ने ही निवडणूक लढली.