
चंद्रभागा नदीतील अपुरे अन् प्रदूषित पाणी आणि त्यामुळे वारकऱ्यांच्या स्नानाची झालेली गैरसोय या विषयाकडे लक्ष वेधत दैनिक ‘सामना’ने दणका दिल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपेतून जागे झाले. भीमा पाटबंधारे विभाग आणि पंढरपूर नगरपरिषदेला तातडीने पत्र लिहून मोहिनी एकादशीला नदीपात्राची स्वच्छता करा आणि पात्रात स्नानासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून द्या, असे निर्देश दिले. प्रदूषण मंडळाने हे निर्देश म्हणजे वरातीमागून घोडे असेच काहीसे आहे. कारण एकादशी झाल्यानंतर दुसऱया दिवशी त्यांना ही उपरती झाली.
























































