
यंदाच्या ऍशेस मालिकेसाठीचा ऑस्ट्रेलिया दौरा इंग्लंड संघासाठी संकटमयच ठरत आहे. आधीच तो संघ मालिकेत 0-2 अशा पिछाडीवर आहे. त्यातच तिसऱया कसोटीच्या दुसऱया दिवशीच इंग्लंडच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तिसऱया कसोटीचा दुसरा दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी पूर्ण इंग्लंड संघाची कोरोना आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. सुदैवाने या चाचणीत सर्वच कोरोना निगेटिव्ह निघाले. नंतर मैदानात ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडच्या पहिल्या डावातील 185 धावांना सर्व बाद 267 असे प्रत्युत्तर देत पहिल्या डावात 82 धावांची आघाडी घेतली. दुसऱया दिवसअखेर इंग्लंडची दुसऱया डावात 4 बाद 31 अशी शोचनीय अवस्था झाली आहे. अद्याप त्यांना
दुसऱया डावातही इंग्लंडची घसरगुंडी
आधीच सपोर्ट स्टाफला झालेल्या कोरोनाच्या बाधेचा दबाव असलेला इंग्लंडचा संघ मैदानातही ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांच्या तुफानापुढे 4 बाद 31 असा पार गळपटला. मिचेल स्टार्कने जॅक क्राऊली (5) आणि डेव्हिड मलान (0 ) यांना झटपट तंबूत धाडले. तर स्कॉट बोलँडने सलामीवीर हसीब हमीद (7 ) आणि जॅक लीच (0) यांना स्वस्तात तंबूत पाठवत इंग्लडच्या डावाची दुर्दशा उडवली. दुसऱया दिवसअखेर कर्णधार जो रूट (नाबाद 12 ) आणि बेन स्टोक्स (नाबाद 2) ही इंग्लंडची बिनीची जोडी मैदानात होती. इंग्लंडला अजूनही डावाचा पराभव टाळण्यासाठी 51 धावांची गरज असून त्यांचे 6 फलंदाज अद्याप खेळायचे आहेत.
ऑस्ट्रेलियाने आज आपला पहिला डाव पुढे सुरू करीत 87.5 षटकांत सर्व बाद 267 अशी मजल मारत इंग्लंडवर 82 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मार्क्यूस हॅरिस (76) आणि मिचेल स्टार्क (नाबाद 24) हे ऑस्ट्रेलियन डावाला आकार देणारे स्टार फलंदाज ठरले.




























































