ऍशेसचे महायुद्ध आजपासून , ऑस्ट्रेलिया-इंग्लंड राखेसाठी भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यानच्या बहुचर्चित आणि प्रतिष्ठेच्या ऍशेस कसोटी क्रिकेट मालिकेला उद्या बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. तब्बल 42 दिवस चालणाऱया क्रिकेटच्या या सर्वात जुन्या महायुद्धात 5 कसोटी सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलियन संघ पॅट कमिन्स या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मालिकेसाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडचा संघही सलामीच्या लढतीत प्रमुख गोलंदाज जेम ऍण्डरसनच्या गैरहजेरीत मालिकेची सुरुवात करणार आहे. खराब हवामानामुळे उभय संघांना सरावाची फारशी संधी मिळाली नाही. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही हे दोन्ही संघ एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आतूर झाले आहेत. इंग्लंडने 2010-11 मध्ये ऑस्ट्रेलियात अखेरची कसोटी मालिका जिंकली होती. 3-1 फरकाने मिळविलेल्या या मालिका विजयाचे शिलेदार जेम्स ऍण्डरसन व स्टुअर्ट ब्रॉड या वेगवान जोडगोळीवरच यंदाही इंग्लंडची मदार असेल. मात्र ऍण्डरसन शंभर टक्के फिट नसल्यामुळे त्याला पहिल्या कसोटीत विश्रांती देण्यात आली आहे.

उभय संघ

ऑस्ट्रेलिया – डेक्हिड कॉर्नर, मार्क्स हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टीक्हन स्मिथ, ट्रकिस हेड, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नाथन लियोन, जोश हेजलवूड.

इंग्लंड – रोरी बर्न्स, हसीब हमीद, जॉक क्राऊली, डेव्हिड मालन, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, जॉनी बेयरस्टॉ, जोस बटलर (यष्टिरक्षक), डॉम बेस, ख्रिस कोक्स, ओली रॉबिन्सन, मार्क वूड, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच.