आशिष शेलारांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवू नये, अनिल परब यांचा टोला

आशिष शेलारांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवू नये अशी टीका आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली. भाजपला सत्तेची स्वप्न पडत आहेत आणि त्याच स्वप्नात त्यांनी भाजपच्या महिला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवावा’, असा टोलाही परब यांनी लगावला.

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आशिष शेलार यांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी असे मत व्यक्त केले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज पत्रकारांनी परब यांना प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी शेलारांना हा टोला लगावला.

राज्यपालनियुक्त जागांबाबत माहिती देताना अनिल परब म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना राज्यपालनियुक्त जागांबाबत 15 दिवसांत निर्णय घ्यावा अशी विनंती केली होती. परंतु याबाबत राज्यपालांनी अजून कोणताही निर्णय घेतला नसून याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील.

आपली प्रतिक्रिया द्या