
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद आपल्याला मिळावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. प्रदेशाध्यक्ष पद मिळावे यासाठी त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीवर बोट रोखले आहे.
थोरात यांच्यामुळेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कमी जागांवर विजय मिळाला, असा आरोप करत अशोक चव्हाण यांनी थेट काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पद मिळावे अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीनंतर चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून त्या जागी थोरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता मात्र चव्हाण यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष व्हायचे आहे.



























































