चार वर्षांत 64 हजार कोटी खर्चूनही सिंचन क्षमता कमीच, चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अशोक चव्हाण - 1) 8 डिसेंबर, 2008 ते 15 ऑक्टोबर, 2009, 2) 7 नोव्हेंबर, 2009 ते 9 नोव्हेंबर, 2010 (काँग्रेस)

सामना प्रतिनिधी । मुंबई

गेल्या चार वर्षांत 64 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करूनही राज्याची सिंचन क्षमता न वाढल्याने हादेखील घोटाळाच समजायचा का, असा सवाल करतानाच याची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज केली. काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची आर्थिक परिस्थिती खालावल्याची बोंब ठोकणाऱया भाजपच्या सरकारमुळे राज्य आर्थिक खाईत गेल्याची टीकाही त्यांनी केली.

मोदी सरकारनेच नेमलेल्या 15 व्या वित्त आयोगाने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबाबत नोंदवलेली निरीक्षण राज्य सरकारला आरसा दाखवणारी आहेत. भाजपच्या कार्यकाळात महाराष्ट्र गाळात चालला आहे हे स्पष्ट दिसत आहे. 2013-14 पर्यंत राज्यावर जवळपास 2 लक्ष 69 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. राज्य स्थापनेपासून 54 वर्षांत एवढे कर्ज सरकारने घेतले होते, परंतु केवळ चार वर्षांत या सरकारने कर्ज दुपटीने वाढवले आहे. तीन वर्षांत राजकोषीय तूट 1.7 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर गेली आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात केवळ एकदा काही कोटी रुपयांच्याच तुटीचा अर्थसंकल्प सादर केला गेला असताना संपूर्ण सभागृह डोक्यावर घेणाऱया भाजपने सलग दोन वर्षे तुटीचा अर्थसंकल्प सादर केल्याची टीका चव्हाण यांनी केली.

n एवढय़ा मोठय़ा प्रमाणात खर्च होऊनही राज्यातील सिंचन क्षमतेत वाढ झाली नाही असे वित्त आयोगाने म्हटले आहे. तेव्हाचे विरोधी पक्षातील नेते व आताचे मुख्यमंत्री व तत्कालीन विरोधी पक्षनेते यांच्याच म्हणण्यानुसार हाही घोटाळाच असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर तत्काळ चौकशी आयोग नेमावा किंवा चितळे यांच्याकडून याचीही चौकशी करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी केली.