अंगठय़ा, रत्ने आणि चिंचोके एसआयटीच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वासनाकांडाचा अड्डा असलेल्या भोंदू अशोक खरातच्या नाशिक येथील ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयाची सोमवारी पुन्हा तपासणी करण्यात आली. तपासी पथकाने तेथील रत्ने, चिंचोके व अंगठय़ा हस्तगत केल्या. तसेच काही आक्षेपार्ह वस्तूही पथकाच्या हाती लागल्या आहेत. खरात याने नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात कार्यालय सुरू केले होते. तेथेच तो महिलांवर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे समोर आले आहे.