निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा; एडीबी बँकेत उपाध्यक्ष होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लवासा यांनी राष्ट्रपतींकडे आपल्या पदाचा राजीनामा देत 31 ऑगस्टपर्यंत कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे. सप्टेंबपासून आशियाई विकास बँकेत (एडीबी) ते उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच आयुक्त लवासा यांनी राजीनामा दिला आहे. जानेवारी 2018 मध्ये त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या इतिहासात कार्यकाळ पूर्ण न करणारे ते दुसरे आयुक्त ठरले आहेत. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा हे एप्रिल 2021 मध्ये निवृत्त होत आहेत. लवासा यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना मुख्य निवडणूक आयुक्तपदी बढती मिळाली असती.