मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे तीनतेरा, एक वर्षाच्या आत रस्ते उखडले

672

केंद्रशासनाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यशासनाने ग्रामीण भागातील रस्ते शहरांना जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्च करून तयार बनवलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे केल्याचे दिसून येत आहे. आष्टी तालुक्यातील पोखरी ते कऱ्हेवाडी 5.5 कि.मी., राज्यमहामार्ग 75 ते आंधळेवाडी 3 किमी या रस्त्यांचे काम होऊन एक वर्ष होण्या अगोदरच रस्त्यांवरती जागोजागी खड्डे पडले आहेत. अधिकारी व गुत्तेदार यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा निधी हडपल्याने या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असे ग्रामस्थात बोलले जात आहे.

सरपंच केशव गर,उपसरपंच जालिंदर गायकवाड यांनी ग्रामपंचायताचा ठराव घेऊन कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रार केली होती याची दखल न घेतल्याने एक वर्षाच्या आत रस्ता जागोजागी उखडला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत तालुक्याच्या विकासासाठी माजी आ.भीमराव धोंडे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून रस्त्यांचे कामे पूर्ण केली हा निधी शासन स्तरावरुन मंजुर झाला असला तरी सदरील निधीमध्ये करण्यात येत असलेले कामे अधिकारी व गुत्तेदार यांच्या संगनमताने अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. तालुक्यातील पोखरी ते कऱ्हेवाडी या 5.5 कि.मी.तसेच रा.म 57 ते आंधळेवाडी या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.

पोखरी ते कऱ्हेवाडी या रस्त्याचे काम सुरू असताना 20 सप्टेंबर रोजी कऱ्हेवडगांचे सरपंच केशव बांगर, उपसरपंच जालिंदर गायकवाड यांनी व ग्रामस्थांनी होत असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे कार्यकारी अभियंता बीड यांना लेखी निवेदनाद्वारे तक्रार दिली, कामही अनेक वेळा बंद केले होते. वेळीच दखल न घेतल्याने या रस्त्यासाठी मंजूर झालेल्या निधीचा गैरवापर झाल्याने रस्तावर एक वर्षाच्या आत खड्डेच खड्डे पडले असून रस्ता खचला आहे. अनेक रस्त्यांची अशी अवस्था बनली आहे. अधिकारी व गुत्तेदारांच्या संगनमताने केवळ निधी हडपण्याचे काम केले जात आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन आष्टी तालुक्यातील होणारी कामे निकृष्ट दर्जाची होण्याची शक्यता असुन ग्रामिण भागातील जनतेचा आदर म्हणुन वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी कामाच्या दर्जाकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट असल्याने ग्रामस्थांकडून रोखले
राज्यमार्ग 57 ते आंधळेवाडी या तीन किलोमीटर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एक वर्षापूर्वी झाले. काम सुरू असताना वेळोवेळी दर्जा बाबत तक्रार केली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. आता ते खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. खड्डे बुजवत असताना पुर्ण काळजी घेतली जात नाही म्हणून ते काम रोखले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या