
लेकाने बाबांचे स्वप्न अगदी अनोख्या पद्धतीने पूर्ण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अश्विनला बाबांना सरप्राईज द्यायचे असते. 14 वर्षांपूर्वी अश्विनच्या बाबांना बुलेट घ्यायची होती, पण घरखर्च, कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनिवडी, शिक्षणाचा खर्च या सगळ्यात त्यांचे बुलेट घेण्याचे स्वप्न कुठेतरी राहून गेले होते. कुटुंबासाठी बाबांनी स्वतःचा आवडीनिवडींना मागे ठेवले याची जाण ठेवून अश्विनने बाबांना सरप्राईज दिले. व्हायरल व्हिडीओत असं दिसतंय की, अश्विन स्वतःसाठी बुलेट घेतोय असे सांगून आई आणि बाबांना शो-रूममध्ये घेऊन जातो. त्यानंतर नवीन बुलेटची चावी वडिलांना देताना दिसतो. ही बाईक त्यांच्यासाठीच असते याबाबत त्यांना कल्पना नव्हती, पण लेकाने सांगितल्यानंतर बाबांच्या चेहऱयावर आनंद आणि आई भावनिक झाली.