
Asia Cup 2025 मध्ये साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात हिंदुस्थानने ओमानचा पराभव करत विजयाची हॅट्रीक साजरी केली. टीम इंडियाने दिलेल्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओमानच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांची शाळा घेतली. सलामीला आलेल्या कर्णधार जतिंदर सिंग आणि आमिर कलीमने संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागी केली. आमिरने 46 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 64 धावांची वादळी खेळी केली. तसेच जतिंदर सिंगने सुद्धा 5 चौकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. त्यानंतर हम्माद मिर्झाने एकट्याने खिंड लढवली आणि 33 चेंडूंमध्ये 51 धावांची आक्रमक खेळी केली. परंतु तो संघाला विजयी करण्यात अपयशी ठरला. अखेर टीम इंडियाने 22 धावांनी ओमानचा पराभव करत बाजी मारली आणि विजयी हॅट्रीक साजरी केली.