अशियाचा किंग कोण ?; हिंदुस्थान-श्रीलंका आमने  सामने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ढाका

रोहित शर्माच्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाने काही दिवसांपूर्वीच बांगलादेशला हरवून आशिया कपचे जेतेपद राखल्यानंतर आता हिंदुस्थानच्या युवा संघाला (19 वर्षांखालील) आशिया कप चॅम्पियन होण्याची संधी असणार आहे. प्राब सिमरन सिंगच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या युवा संघासमोर उद्या श्रीलंकेच्या युवा संघाचे आव्हान असणार आहे. हिंदुस्थानच्या युवा संघाने साखळी फेरीत विजयाची हॅटट्रिक साजरी करीत अगदी दिमाखात सेमी फायनलमध्ये धडक मारली.

श्रीलंकेने साखळी फेरीत बांगलादेश, पाकिस्तान व हाँगकाँग या संघांना अस्मान दाखवत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तसेच शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत त्यांनी अफगाणिस्तानला 31 धावांनी हरवत अंतिम फेरीत एण्ट्री मारली. आता उद्या होणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत कोण बाजी मारतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.