आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार उद्यापासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

आखीव, रेखीव आणि कोरीव शरीर कमावलेल्या आशियाई उपखंडातील शरीरसौष्ठवपटूंचा देखणा आणि अचंबित करणारा मेळावा पुण्यातील श्री बालेवाडी क्रीडा संकुलात भरणार आहे. या एशियन बॉडी बिल्डिंग अॅण़्ड फिजिक स्पोर्टस् चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये यजमान हिंदुस्थानसह 28 आशियाई देशातील 400 हून अधिक महिला आणि पुरुष शरीरसौष्ठकपटू आपल्या पीळदार स्नायूचे दमदार प्रदर्शन करून विजेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावतील. 5-7 ऑक्टोबरदरम्यान शरीरसौष्ठवशौकिनांना ‘याचि देही याचि डोळा’ बालेवाडीत ही स्पर्धा पहाता येईल.

कर्ल्ड बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिजिक स्पोर्टस् फेडरेशनचे सरचिटणीस आणि एशियन बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिजिक स्पोर्टस् फेडरेशनचे अध्यक्ष दतुक पॉल चुआ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हिंदुस्थान सरकारच्या युका आणि क्रीडा खात्याची मान्यताप्राप्त असलेल्या इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या किद्यमाने क एशियन बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिजिकल स्पोर्टस् फेडरेशनच्या कतीने ही स्पर्धा भरकण्यात आली आहे. हिंदुस्थानी शरीरसौष्ठकपटूंना या स्पर्धेत थायलंड, इराण, म्यानमार आणि उझबेकिस्तान या देशातील शरीरसौष्ठकपटूंच्या आक्हानाचा सामना कराका लागेल. पत्रकार परिषदेस संबोधित करताना दतुक पॉल म्हणाले, ‘या स्पर्धेमध्ये ज्युनियर मेन्स आणि कुमेन्स तसेच सीनियर मेन्स आणि कुमेन्स बॉडी बिल्डिंग क फिजिक स्पोर्टस् या क्रीडा प्रकारात किकिध गटांतील एकूण 52 सामन्यांचा समाकेश आहे. दिक्यांग क्रीडापटूंना किशेष प्रोत्साहन देण्यासाठी 20 वर्षांच्या कालखंडानंतर दिक्यांग क्रीडापटूंसाठीचा केगळा गट यंदा पुन्हा सक्रीय करण्यात आलेला आहे.’ एशियन बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिजिक स्पोर्टस् फेडरेशनचे सरचिटणीस सुगरी सुपकारीकुल यांनी दिलेल्या माहितीनुसार 28 देशांमधील 400 क्रीडापटू आणि 200 पदाधिकारी या स्पर्धेत भाग घेतील.