
‘ऑल असम स्टूडेंट्स यूनियन’ आणि ‘कृषक मुक्ति संग्राम’ समितीने रविवारी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे आसाम दौऱ्यावर असताना त्यांच्या विरोधात निदर्शने केली आणि नागरिकता (संशोधन) कायदा मागे घेण्याची मागणी केली. अनेक जिल्ह्यांमध्ये एएएसयूच्या सदस्यांनी वादग्रस्त कायद्यांच्या प्रत जाळल्या, गुवाहाटी आणि अन्य ठिकाणांवर त्यांनी काळे झेंडे दाखवले.
एएएसयूचे अध्यक्ष दिपांका कुमार नाथ यांनी सांगितले की, ‘सीएएने आसाममधील लोकांचे अस्तित्व संकटात आले आहे. तसेच त्यांची संस्कृती, ओळख आणि भाषा देखील संकटात आली आहे. जोपर्यंत सीएए कायदा मागे घेतला जात नाही, आम्ही विरोध सुरूच ठेवू’.
दरम्यान, ‘कृषक मुक्ति संग्राम’ समिती सदस्यांनी राष्ट्रीय महामार्ग-27 बंद केला होता आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे पुतळे जाळले. अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला.
याआधी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी कोकराझारमध्ये पहिले बोडोलँड प्रादेशिक क्षेत्रात ‘समझौते दिवस समारोह’ मध्ये सहभाग घेतला, आणि सांगितले की “ऐतिहासिक कराराद्वारे” शांती आणि विकासचा मार्ग प्रशस्त करत ईशान्येकडील दहशतवाद संपवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नलबाडी येथे एका सभेत बोलताना केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी आरोप केला की, ‘काँग्रेस-एआईयूडीएफ’ आघाडी सत्तेत आल्यास घुसखोरांचे स्वागत करण्यासाठी “सर्व दरवाजे” खुले करतील.





























































