
आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांना घेऊन निघालेले हेलिकॉप्टर ढगाळ हवामानामुळे अचानक तांत्रिक बिघाड उत्पन्न झाल्याने त्याच्या पायलटने त्याला लिलाबरी विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत यशस्वी उतरविल्याने त्यांचे प्राण थोडक्यात बचावल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेत मुख्यमंत्री सोनोवाल यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. गुवाहाटी ते लाखीमपूर अशा दौर्यासाठी सोनोवाल हेलिकॉप्टरने निघाले असताना आसाम, अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या बंदेरदेवा येथील टेकडय़ांना ढगाळ वातावरणामुळे ओलांडताना येणे कठीण होत असल्याचे पायलटच्या लक्षात आल्याने त्याचे इमर्जन्सी लँडिंग केले होते.



























































