फटाके उडवण्यास मनाई केल्याने वऱ्हाडींनी चोपले, तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुवाहाटी

आसामच्या नलबारी येथे लग्नसमारंभातील लोकांना फटाके उडवण्यास मनाई केल्याप्रकरणी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच या घटनेतील तरुणाचा मृत्यू झाल्याने सहा आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जतिन दास (२५वर्षे) मजूर असून आसामच्या घोरातल गावात राहत होता. तसेच जतिनच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी लग्नासमारंभाचा सोहळा पार पडत होता.यामुळे लग्नसोहळ्या दरम्यान वऱ्हाडी मंडळीकडून फटाके उडलवले जात होते. मात्र फटकांच्या आवाजामुळे जतिनला झोप येत नव्हती. तसेच काही वेळानंतर लग्नसमारंभात उडवल्या जाण्याऱ्या फटाक्याची ठिणगी त्याच्या घराच्या आतमध्ये पडल्यानं जतिनचं अंग भाजलं गेलं. त्यामुळे जतिन लग्नसमारंभाच्या ठिकाणी पोहचून तेथील लोकांना फटाके उडवण्यापासून मनाई करत होता. परंतु वऱ्हाडी लोकांनी जतिनवर संतप्त होऊन बेदम मारहाण केली.त्याचवेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आसामचे पोलीस अधिकारी शिलादित्य चेटिया यांनी घटनास्थळी पोहचून तेथील घटनेची चौकशी केली आहे. तसेच चौकशी दरम्यान जतिनला मारहाण केलेल्या सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.