वाजपेयींच्या अस्थींचे गंगेत विसर्जन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे रविवारी गंगा नदीत विसर्जन करण्यात आले. वाजपेयी यांच्या कन्या नमिता, जावई रंजन भट्टाचार्य आणि नात निहारिका यांनी हर की पौडी येथील ब्रम्हकुंड घाटावर वैदिक मंत्रोच्चारात वाजपेयींच्या अस्थी गंगेच्या प्रवाहात सोडल्या.

देशातील १०० नद्यांमध्ये वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन होणार

 यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मिख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत,भाजप प्रदेश अध्यक्ष अजय भट्ट आणि हरिद्वारमधील भाजप खासदार रमेश पोखरियाल निशंक उपस्थित होते. याआधी अस्थी कलश यात्रा काढण्यात आली होती. हरिद्वारमधील भल्ला मैदानापासून हर की पौडीपर्यंत ही यात्रा काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते. वाजपेयींच्या अस्थींचे देशातील १०० नद्यांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे.

summary…/atal-bihari-vajpayee-ashes-immersed-haridwar-ganga-