माथेरानचे संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्यावर हल्ला; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली भेट

माथेरानचे संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्यावर शनिवारी बंडखोर आमदार महेंद्र थोरवे यांच्या समर्थक टोळक्याने हल्ला केला. प्रसाद सावंत याना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी त्यांची एमजीएम रुग्णालयात भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी आहे असे आदित्य ठाकरे यांनी सावंत यांना सांगितले.