
जॉर्जियात असलेल्या अमेरिकेच्या फोर्ट स्टिव्हर्ट लष्करी तळावर हल्ला झाल्याने आज खळबळ उडाली. लष्करी तळावर अज्ञातांनी केलेल्या बेछूट गोळीबारात अनेक सैनिक जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. फोर्ट स्टिव्हर्ट हा अमेरिकेचा जॉर्जियातील सर्वात मोठा लष्करी तळ आहे. येथे हल्ला कोणी केला हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र हल्ल्यात काही जवान व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.