राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्ला करणाऱ्याला अटक

7424
sharad-pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला तब्बल आठ वर्षानंतर अटक करण्यात दिल्ली पोलिसांनी यश आले आहे. शरद पवार यांच्यावर 2011 मध्ये एका कार्यक्रमात हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर फरार झालेल्या अरविंदर सिंग या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे.

24 नोव्हेंबर, 2011 ला दिल्लीमध्ये इफ्कोच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शरद पवार दाखल झाले होते. यावेळी अरविंदर सिंग उर्फ हरविंदर याने त्यांच्यावर हल्ला केला होता. हल्ल्यानंतर त्याला ताब्यातही घेण्यात आले होते. परंतु न्यायालयात खटला सुरु असताना तो फरार झाला होता. 29 मार्च, 2014 मध्ये दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. अखेर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते त्याचा शोध घेत होते.

arvinder

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, पवार कृषीमंत्री असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला होता. त्यावेळी पवार यांनी या कृत्याला भ्याडपणा असे त्यावेळी म्हटले होते, तर अरविंदर याने भ्रष्ट असल्याने थप्पड लगावण्यासाठी आलो होते असे म्हटले होते. पवारांवरील हल्ल्यानंतर अरविंदर याला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र तो कोठडीतून पळाला होता.पोलिसांनी त्याचा कसून शोध घेतला मात्र तो सापडला नव्हता. अखेर दिल्ली न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या