मित्राकडे पैसे घेण्यासाठी आला अन हल्लेखोर जाळ्यात अडकला, खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तरूणावर खुनी हल्ला करून फरार झालेला आरोपी मित्राकडे पैसे घेण्यासाठी आला असता, युनिट एकने त्याला अटक केली आहे. त्याने बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनी हल्ला करत दहशत पसरविली होती. प्रशांत भाऊसाहेब घाडगे (वय 22, रा. कात्रज, खोपडेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक संदीप भोसले आणि अमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी खुनाच्या प्रयत्नातील आरोपी मार्केटयार्ड परिसरात मित्राकडे पैसे घेण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून प्रशांत घाडगे याला अटक केली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, अजय थोरात, इम्रान शेख, विठ्ठल साळुंखे, अय्याज दड्डीकर यांनी केली.