
संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळी २५२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये १५१ पुरूष, १०१ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ५५३५ कोरोनाबाधित आढळले असून २६६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २५९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २६०७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आज सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील१९१ रुग्ण असून यात घाटी परिसर (३), सुराणा नगर (१), सादातनगर (२), मथुरानगर (१), ज्योतीनगर (२), जयसिंगपुरा (१), रामनगर (१), विद्यापीठ गेट परिसर (१), गणेश कॉलनी (१), सइदा कॉलनी (१), रशीदपुरा (२), लोटा कारंजा (२), कांचनवाडी (६), सिडको ,एन सहा (२), संभाजी कॉलनी (२), संभाजीनगर (२), सिडको एन अकरा (१), अजबनगर (१), हर्सुल परिसर (३), नूतन कॉलनी (२), भाग्यनगर (१), अरिहंत नगर (४), शिवाजीनगर (२), एन दोन सिडको (६), मयूरनगर (२), वाईकर लॉन्स परिसर (१), चिकलठाणा (१) सुदर्शननगर (५), होनाजीनगर (२), छत्रपती नगर (३), भक्ती नगर (२), पद्मपुरा (२), हसनाबाद (२), मातोश्रीनगर (६), हुसेन कॉलनी (३), नंदनवन कॉलनी (१), नारळीबाग (१), समर्थ नगर (१), उदय कॉलनी (१), शिवशंकर कॉलनी (६),पडेगाव (१), हनुमाननगर (१), एन चार सिडको (४), कोटला कॉलनी (१), पुंडलिक नगर (६),संजयनगर (१), एन पाच सिडको (१), विठ्ठलनगर (१), जयभीमनगर, टाऊन हॉल (३), रमानगर (१), सिद्धार्थ नगर, एन बारा (१), अजिम कॉलनी, जुना बाजार (८), हर्सुल जेल (३), भगतसिंग नगर (२), साई नगर (८), टिळक नगर (१), एस टी कॉलनी ठाकरे नगर (१), जुनी एसटी कॉलनी (१), भारतमातानगर (२), स्वामी विवेकानंदनगर (१), रायगडनगर (१), गोकुळनगर, जाधववाडी (१), मिसारवाडी (१), एन बारा सिडको (१), एन नऊ सिडको (१), बायजीपुरा (१), एन आठ, सिडको (४), पिसादेवी रोड (१), मिल कॉर्नर (१), ठाकरे नगर (३), जयभवानीनगर (५), राम नगर,एन दोन (११), साईनगर (१), गजानन नगर (३) उत्तमनगर (९), छत्रपतीनगर (१), हडको कॉर्नर (१), नाथनगर (२), गुरुगोविंदसिंगपुरा, मिलिंद नगर (४), अन्य (२)
ग्रामीण भागातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, आज ६१ रुग्ण आढळून आले. यात सिल्लोड (१), बिरगाव कासारी, सिल्लोड (१), पोखरी, वैजापूर (१), वैजापूर (१), अश्वमेध सो., बजाजनगर (२), बजाजनगर (१), महाराणा प्रताप चौक, बजाजनगर (२), मृत्यूंजय सो., बजाजनगर (१), सिडको महानगर एक (८), दत्तकृपा सो., बजाजनगर (१), कोलगेट चौक, बजाजनगर (१), देवदूत सो.,बजाजनगर (१), सौदामिनी सो.,बजाजनगर (१), बजाजविहार, बजाजनगर (१), वृंदावन हॉटेल परिसर, बजाजनगर (२), गंगा अपार्टमेंट, बजाजनगर (१), भगतसिंगनगर परिसर, बजाजनगर (१), सुवास्तू सो., बजाजनगर (१), नवजीवन सो., बजाजनगर (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर (१), कांजन सो, सिडको महानगर (१), भगतसिंग शाळेजवळ, बजाजनगर (१), दीपचैतन्य सो, बजाजनगर (१), न्यू दत्तकृपा सो., बजाजनगर (२), सिंहगड सो., बजाजनगर (१), मंजित प्राईड, बजाजनगर (१),साईश्रद्धा पार्क बजाजनगर (१), कन्नड (१), औराळी, कन्नड (१), कुंभेफळ (२), राजीव गांधीनगर, रत्नपुर (३), इसारवाडी, पैठण (२), वाळूज, गंगापूर (१), बकवालनगर, वाळूज (२), कान्होबावाडी, गंगापूर (१), अविनाश कॉलनी, गंगापूर (१), आगवणे वस्ती, लासूर गाव (१), दर्गाबेस, वैजापूर (८) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
खासगी रुग्णालयात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शहरातील एका खासगी रुग्णालयात २९ जून रोजी शिवाजी नगरातील ५८ वर्षीय पुरूष, जुना बाजार नारायणनगरातील ६१ वर्षीय स्त्री कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये आतापर्यंत ५८, घाटीत २००, मिनी घाटीमध्ये ०१ अशा एकूण २५९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.




























































