संभाजीनगरात आज 51 बाधितांची वाढ; एकूण संख्या 1700 वर

710

संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळी ४७ आणि दुपारी ४ अशा ५१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७०० झाली आहे. यापैकी १०८५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले असून ८७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ५२६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये जसवंतपुरा (१), संजय नगर, मुकुंदवाडी (१), खोकडपुरा (२), अजिंक्य नगर (१), समता नगर (२), समृद्धी नगर, एन-४ सिडको (१), जय भवानी नगर (१), लेबर कॉलनी (१), मिल कॉर्नर (४), हमालवाडी, रेल्वे स्टेशन (१), भावसिंपुरा (२), शिवशंकर कॉलनी (५), पिसादेवी रोड (१), कटकट गेट (१), सिल्लेखाना नूतन कॉलनी (१), बारी कॉलनी (१),उल्का नगरी (१),एन-सहा, संभाजी कॉलनी, सिडको (१),शरीफ कॉलनी (१), कैलास नगर (४), स्वप्न नगरी, गारखेडा परिसर (१), भवानी नगर, जुना मोंढा (१), पुंडलिक नगर रोड, गारखेडा (१), विद्यानिकेतन कॉलनी (1), सुराणा नगर (2), अन्य (३) आणि यशवंत नगर, पैठण (३), अब्दुलशहा नगर, सिल्लोड (१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २१ महिला आणि २६ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

तसेच सायंकाळी ४ वाजता आणखी ४ बाधित आढळून आले. यामध्ये करीम कॉलनी येथील(१),  इंदिरानगर येथील (१), कोहिनूर कॉलनी येथील (१) आणि रहिमनगर येथील  (१) जणांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या