संभाजीनगरमधील हरसुल कारागृहातील 29 कैद्यांना कोरोनाची लागण

534

संभाजीनगर शहरात कोरोनाचा उद्रेक प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यातच आज हरसुल कारागृहातील २९ आरोपी पॉझिटिव्ह निघाल्याने कारागृह प्रशासन हादरले आहे. दरम्यान या सर्वच कैद्यांची माहिती देता येणार नसल्याची माहिती कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली.

संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील ४ दिवसांत कोरोना बाधितांच्या संख्येत ४७, ६३, ६५ आणि आज ९० अशा २६५ बाधितांची वाढ झाली आहे. आज आढळून आल्या 90 जणांमध्ये हरसूल कारागृहातील तब्बल २९ जण पॉझिटिव्ह असल्याचे प्रशासनाने कळवले आहे. यापूर्वी ही या कारागृहातील दोघा आरोपींना कोरोनाची बाधा झाली होती तर नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील २६ वर्षीय कैद्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज २९ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने कारागृह प्रशासन हादरले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या