कामगार नेते उद्धव भवलकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर येथील सिटू कामगार संघटनेचे सेक्रेटरी उद्धव भवलकर (68) यांचे शनिवार 5 सप्टेंबर रोजी दुपारी धूत हॉस्पिटल येथे कोरोना उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर कैलास नगर येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.

उद्धव भवलकर यांचा मराठवाड्यातील कामगार चळवळ मजबुत करण्यात मोलाचा वाटा होता. विद्यार्थीदशेत असताना 1974 च्या मराठवाडा विकास आंदोलनात उद्धव भवलकर यांनी विठ्ठल मोरे यांच्यासोबत काम केले होते. 1975 मध्ये उद्धव भवलकर कळंब येथे एसएफआयची स्थापना राज्य अधिवेशनात त्यांची कामगार चळवळीत यशस्वी सुरुवात झाली. एक अत्यंत धडाडीचे नेतृत्व पक्षाने आणि सीटूने गमावले असल्याची हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.