टाकापाटी येथे भीषण अपघातात मुंबईतील दोघे ठार, 8 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । औसा

औसा तालुक्यातील रत्नागिरी नागपूर राज्य मार्गावरील टाका पाटी येथे टँकर व टाटा सुमो यांच्यात भीषण अपघात झाला. त्यामध्ये मुंबईतील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 8 जखमी झाले आहेत.

टाटा सुमो मधील सर्वजण हे लातुर जिल्ह्यातील शीरूळ अनंतपाळ तालुक्यातील असून ते तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जात होते. दोन्ही मृत व्यक्ती ह्या मागील 25 वर्षापासून मुंबई येथे राहत होते. ते एक दोन दिवसापुर्वी आपल्या गावी म्हणजे येरोळ येथे आले होते. त्यांनी गावी येऊन काल देवीची कंदुरी करून ते आज तुळजापूरला जात असताना टाटा सुमो MH 24 C 6457 व दिलीप बुल्डकाँन कंपनीच्या टँकर MP 39 G 1863 ची समोरासमोर टक्कर झाली. त्यामध्ये विवेक राजे शिर्के व अरूण कोयंडे यांचा जागीच मृत्यु झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले. जखमींना लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.