तावरजा पट्ट्यात दुष्काळाची गडद सावली, रब्बीची पेरणीही धोक्यात

425

औसा तालुक्यातील भादा परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाळा संपत आला तरी अद्याप पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. या परिसराची तहान भावणारा तावरजा मध्यम प्रकल्प अद्याप कोरडाठाक आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तसेच रब्बीची पेरणी रामभरोसे झाली आहे. या भागावर 1972 च्या दुष्काळाची पुनरावृत्ती निर्माण झाल्याचे चिन्ह स्पष्ट झाले आहे.

प्रामुख्याने हा परिसर पावसावर अवलंबून असणारा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात खरीपाची पेरणी काही प्रमाणात झाली मात्र पावसाअभावी पिकांची ही वाढ झाली नाही. गतवर्षी ही रब्बीची पेरणी नाही आणि यावर्षीची पेरणी रामभरोसे झाले आहे. त्यामुळे या परिसरावर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न डोकेदुखी ठरत आहे. या परिसराचे प्रामुख्याने तावरजा प्रकल्प हा तहान भागवणारा होता. मात्र पावसाळा संपत आला तरी या परिसरात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने या परिसरावर अनेक गावात पाण्यासाठी ओरड सुरू झाली आहे.

मागील पाच दिवसात हवामान खात्याने अंदाज वर्तवला असला तरी या परिसरावर रिमझिम पावसानेच सुरुवात झाली. मोठा पाऊस या काळात एक ही पडला नसून यामुळे नदी-नाले बोर विहीर कोरडेठाक पडले असून पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या परिसरातील एकंदरीत जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र व दुष्काळाची गडद सावली या परिसरावर पसरलेली आपणास पाहायला मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या