ऑस्ट्रेलियाचा आणखी एक विस्फोटक खेळाडू होणार हिंदुस्थानचा जावई, केला साखरपुडा

4625

मैदानावर चौकार-षटकारांची आतिषबाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या एका विस्फोटक खेळाडूला हिंदुस्थानी तरुणीने क्लिन बोल्ड केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या या 31 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी साखरपुडा झाल्यानंतर त्याने ही घोषणा केली.

glenn-maxwell

मॅक्सवेल ज्या तरुणसोबत लग्न करणार आहे तिचे नाव विनी रामन असे आहे. हिंदुस्थानी वंशाच्या या तरुणीसोबत मॅक्सवेलला देशविदेशात फिरताना पाहण्यात आले. विनी रामन हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मॅक्सवेलसोबतचे फोटो शेअर केले आहे.

glenn-maxwell-2

मॅक्सवेल याने काही महिन्यांपूर्वी मानसिक अस्वास्थ्यामुळे क्रिकेटमधून आराम घेतला होता. मानसिक आणि शारीरिक थकवा आलेल्या मॅक्सवेल याला या काळामध्ये विनी रामन हिने साथ दिली होती. तिच्यामुळेच मी पुन्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरू शकलो, असा खुलासाही त्याने केला होता.

glenn-maxwell-3

दरम्यान, विनी रामन ही ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये स्थायिक झाली आहे. तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार व्यवसायाने ती फार्मासिस्ट आहे. सध्या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू असल्या तरी अनेक महिन्यांपासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाच्या बक्षिस समारंभातही हे दोघे एकत्र दिसले होते.

glenn-maxwell-1

हिंदुस्थानी तरुणीशी लग्न करणारा मॅक्सवेल पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू नाही. याआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज शॉन टेट याने देखील हिंदुस्थानी वंशाच्या तरुणीशी लग्न केलेले आहे. तो हिंदुस्थानी मॉडेल मशुम सिंग हिच्याशी 2014 मध्ये लग्नबंधनात अडकला.

Shaun Tait

आपली प्रतिक्रिया द्या